कृषीपंपाचा विजपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST2021-03-18T04:21:21+5:302021-03-18T04:21:21+5:30

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे, बाबुराव गायकवाड, शहाजी नलवडे, तानाजी देशमुख, सुधीर ...

Do not disconnect the power supply to the agricultural pump | कृषीपंपाचा विजपुरवठा खंडित करू नका

कृषीपंपाचा विजपुरवठा खंडित करू नका

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे, बाबुराव गायकवाड, शहाजी नलवडे, तानाजी देशमुख, सुधीर अभंगराव, महावीर देशमुख, सूर्यकांत घाडगे, संजय घोडके, जयवंत माने, माऊली अष्टेकर, काका बुराडे, पोपट सावतराव, अविनाश वाळके, तानाजी मोरे, दीपक गवळी, लुकमान इनामदार, शंकर मेटकरी, सचिन काळे, संतोष खडतरे, अर्जुन वाघ आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची पिके जळू लागली

वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून थकीत वीजबिलाच्या वसुलीचे नाव करून शेतकऱ्यांची शेतीची व घरगुती वीज तोडण्याची मोहीम सुरू आहे. वीज वितरणकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वीजपुरवठ्याअभावी जळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार थांबवावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेकडून संभाजी शिंदे, शैला गोडसे यांनी दिला आहे.

Web Title: Do not disconnect the power supply to the agricultural pump