शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड;  युटोपियन शुगर्सकडून फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 12:24 IST

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे     युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा या कारखान्याने नुकतीच आपल्या ऊस उत्पादक यांना १५० रु.ची दिवाळी ...

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे    युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा या कारखान्याने नुकतीच आपल्या ऊस उत्पादक यांना १५० रु.ची दिवाळी भेट जाहीर करून गळीत हंगाम २०२०-२०२१ करिता एकुण २२००/- रु.प्रमाणे दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून, कामगारांना ही भरघोस दिवाळी बोनस ही दिला आहे.

कारखान्याच्या सभासदांना २५ रुपये प्रमाणे १० किलो साखर तसेच ज्या ठेवीदारांनी कारखान्याकडे १०,००० हजार रुपये ठेव ठेवलेली आहे.अशा सभासदांना सुद्धा २५ रूपयांप्रमाणे १० किलो साखर घरपोच देण्यात आली आहे. फक्त ऊस उत्पादक व कामगार यांचीच दिवाळी गोड न करता,कारखाना प्रशासनाने ऊस तोडणी मजूर यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना ऊसाच्या फडात जाऊन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांच्या शुभहस्ते दिवाळी साहित्याचे वाटप केले व शुभेच्छा दिल्या. 

युटोपियन च्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साखर कारखानदारीमध्ये सर्वात महत्वाची व पहिली पायरी म्हणजे ऊस तोडणी करणारे कामगार असतात.हे कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऐन दिवाळीच्या सणामध्ये आपल्या घरांपासून-नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर येऊन कडाक्याच्या थंडीमध्ये ऊस तोडणीचे काम करीत असतात.अशा ऊसतोड कामगारांना दिवाळी साजरी करणे अवघड होते. त्यामुळे त्यांना ही दिवाळी साजरा करीता यावी या उद्देशाने कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले.असा उपक्रम राबविणारा युटोपियन शुगर्स हा परिसरातील कारखान्यामध्ये एकमेव असल्याने कारखान्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेDiwaliदिवाळी 2021