शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटितांना पुन्हा नव्यांशीच लग्न करायचंय; वधू-वर सूचक केंद्रांची माहिती; घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:40 IST

शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत. 

दीपक दुपारगुडे -सोलापूर : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात; पण त्या सुटायला किंवा तुटायला क्षुल्लक  कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय काही वर्षांत घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. या घटस्फोटितांना पुन्हा लग्न करायचं आहे, मात्र नव्यांशीच करायचे असल्याची बाब वधू-वर सूचक मंडळात नोंदलेल्या माहितीवरून पुढे आली आहे.

शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत. 

तरुण पिढीत समजून घेण्याची क्षमता कमी तरुण पिढीची समजून घेण्याची क्षमता कमी झाली आहे. दोघांचा इगो प्रॉब्लेम आणि दोघेही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने आता पुढे काय होईल, याची चिंताही नसल्यामुळे प्रमाण अधिक आहे.

अलीकडच्या काळात नवदाम्पत्यांमध्ये एक वेगळाच ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे. तो म्हणजे एक वर्षापर्यंत एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज घ्यावयाचा, नाही जमले तर विभक्त होऊन घटस्फोट घ्यायचा.- धनश्री स्वामी, चालक, वधू-वर सूचक केंद्र

घटस्फोटितांची अपेक्षा काय?वधू-वर सूचक केंद्र, ऑनलाइन मॅरेज ब्युरो यांच्या वेबसाइट आणि कार्यालयात नाव नोंदणी करण्यामध्ये नवीन स्थळ जुळविण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के आहे, तर घटस्फोटितांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

घटस्फोटामागची कारणं... -लॉकडाऊनमध्ये घाईगडबडीत लग्न, विनाविचारपूस, नोकरीची खात्री केली नाही, अशा कारणांनी घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक आहे. दाम्पत्यांमध्ये वाद, मोबाइल आणि सोशल मीडिया, सतत मोबाइल वापरणे, पतीकडून क्रूर वागणूक, तसेच जोडप्यांच्या वादात घरच्यांचा हस्तक्षेप, विशेषत: आई-वडिलांच्या हस्तक्षेपामुळे नवरा-बायकोचे नाते तुटल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :marriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार