शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना कांदा अनुदान देण्यासाठी जिल्ह्याला ३७ कोटी रुपयांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:32 IST

जिल्ह्यातील सात बाजार समित्या; ३३ हजार शेतकºयांसाठी अनुदानाची केली मागणी 

ठळक मुद्देसातबाºयावर नोंद नसलेल्या परंतु तलाठ्याच्या दाखल्यावर नोंद असलेले प्रस्ताव राज्य शासनाकडे आलेयाबाबत शासन स्तरावर निर्णय झाला नाही. मात्र याचा विचार करून कॅबिनेटसमोर निर्णयासाठी प्रस्ताव ठेवावा लागणार

सोलापूर: कांदा अनुदानासाठी जिल्ह्यातील सात बाजार  समित्यांनी ३३ हजार ११८ शेतकºयांसाठी ३६ कोटी ७० लाख २९ हजार ८७४ रुपयांची  मागणी केली आहे.  जिल्हा उपनिबंधकांनी या रकमेची पणन संचालकांकडे मागणी केली आहे.

कांद्याचे दर गडगडल्याने राज्य शासनाने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. सुरुवातीला एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना बाजार समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन केले होेते. 

त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी, करमाळा, मंगळवेढा व अकलूज या बाजार समित्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार ८ हजार ६४३ शेतकºयांच्या खात्यावर ८ कोटी २१ लाख ७७ हजार ५८७ रुपये जमा करण्यात आले. त्यानंतरही                  कांदा दरात वाढ न झाल्याने १६ डिसेंबर १८ ते २८ फेब्रुवारी १९  या कालावधीत कांदा विक्री झालेल्या शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्यांपैकी ३३ हजार ११८ शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. एका शेतकरी खातेदाराला किमान दोनशे क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपयांचे अनुदान देण्यासाठी ३६ कोटी ७० लाख २९ हजार ८७४ रुपयांची आवश्यकता आहे. बाजार समित्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पणनकडे निधीची मागणी केली आहे. 

आठ हजार शेतकरी वेटिंगवर..- कांदा लागवड केली व विक्रीही केली, परंतु कांदा लागवडीची नोंद सातबाºयावर केली नाही, असे अनुदानासाठी अर्ज केलेले ८ हजार ३७ शेतकरी आहेत. सर्वाधिक सोलापूर बाजार समितीचे तर अन्य सहा बाजार समित्यांचे काही शेतकरी आहेत. या शेतकºयांना कांदा लागवडीचा तलाठ्याचा हस्तलिखित दाखला कांदा अनुदान अर्जासोबत जोडला आहे. मात्र शासनाने सातबाºयावर नोंद असलेलेच शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले आहेत. दाखला जोडलेल्यांसाठीजिल्हा उपनिबंधकांनी ७ कोटी ४८ लाख ३१ हजार ९७० रुपयांची मागणी पणन संचालकांकडे केली.

सातबाºयावर नोंद नसलेल्या परंतु तलाठ्याच्या दाखल्यावर नोंद असलेले प्रस्ताव राज्य शासनाकडे आले आहेत. याबाबत शासन स्तरावर निर्णय झाला नाही. मात्र याचा विचार करून कॅबिनेटसमोर निर्णयासाठी प्रस्ताव ठेवावा लागणार आहे.- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री 

टॅग्स :Solapurसोलापूरonionकांदाgovernment schemeसरकारी योजनाbankबँकSubhash Deshmukhसुभाष देशमुख