शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पहाटे चार वाजता आला फोन; पुढे काय झालं वाचा बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:36 IST

ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद

सोलापूर - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पहाटे ४ वाजता एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. अवैध वाहतूक करत असल्याने त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनोळखी इसम जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पोलिसांच्या कारवाईची माहिती देत होता. फोनवर तो म्हणाला, साहेब मी अवैध वाहतूक करतोय. त्यामुळे माझ्यावर दंडात्मक कारवाई व्हावी आणि मला माझ्या वाहनासह सोडून द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांना नियमानुसार कारवाई करा. त्याचे वाहन जप्त करा, असे सांगितले. त्यामुळे या व्यक्तीचे वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई झाली.

सोलापूर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता चाळीस पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गस्ती पथकाला विशेष वाहनेदेखील दिली आहेत.

यासोबत ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद करण्यात आले आहे. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध आणि माहिती गोळा करण्याचे काम गस्ती पथकाद्वारे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी