मधूबनच्या ट्रॅक्टर्सचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:40+5:302021-02-13T04:21:40+5:30

बार्शी :मधुबन ट्रॅक्टर्सच्या वर्धापन दिनानिमित्त १२ ट्रॅक्टर्सचे वितरण व नविन ५०५० डी फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात आले. ...

Distribution of tractors of Madhuban | मधूबनच्या ट्रॅक्टर्सचे वितरण

मधूबनच्या ट्रॅक्टर्सचे वितरण

बार्शी :मधुबन ट्रॅक्टर्सच्या वर्धापन दिनानिमित्त १२ ट्रॅक्टर्सचे वितरण व नविन ५०५० डी फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात आले. जगप्रसिद्ध जाॅन डिअर या अमेरिकन कंपनीचे ऊस्मानाबाद जिल्हा व बार्शी तालुक्याचे अधिकृत वितरक मधुबन ट्रॅक्टर्स गेल्या १२ वर्षा पासून विक्री व सेवा देत असल्याचे मधुबन ट्रॅक्टर्स चे संचालक प्रवीण कसपटे यांनी सांगीतले. मागील वर्षीच महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात विक्री मध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता. या फर्ममध्ये दहा वर्षाहून अधिक काळ काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान संचालक प्रवीण कसपटे, जाॅन डिअर कंपनीचे महाराष्ट्राचे ऐरीया मॅनेजर अंकित सक्सेना, असिस्टंट एरीया मॅनेजर कैलास तासकर, टॅक्टीकल मॅनेजर सावदीप बावा यांच्या हस्ते झाला. (वा. प्र.)

-----

फोटो : १२ मधूबन

मधूबनच्या ट्रॅक्टर्सचे वितरण करताना प्रवीण कसपटे, अंकित सक्सेना, कैलास तासकर, सावदीप बावा

Web Title: Distribution of tractors of Madhuban