दलालांना हाताशी धरून पाच टन बियाणांची विक्री बियाणे वाटपात गैरव्यवहार; दोषींवर कारवाईची मागणी

By Admin | Updated: May 9, 2014 23:45 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T23:45:05+5:30

सांगोला : रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागातर्फे मोफत वितरित करावयाच्या गहू बियाणे वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून, कृषी कर्मचार्‍यांनी ठराविक दलालांना हाताशी धरून सुमारे पाच टन बियाणे खाजगीत विकले असल्याची तक्रार गायगव्हाण (ता. सांगोला) येथील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Distribution of seeds of five tonnes of seeds by brokers holding hand in hand; The demand for action against the guilty | दलालांना हाताशी धरून पाच टन बियाणांची विक्री बियाणे वाटपात गैरव्यवहार; दोषींवर कारवाईची मागणी

दलालांना हाताशी धरून पाच टन बियाणांची विक्री बियाणे वाटपात गैरव्यवहार; दोषींवर कारवाईची मागणी

सांगोला :
रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागातर्फे मोफत वितरित करावयाच्या गहू बियाणे वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून, कृषी कर्मचार्‍यांनी ठराविक दलालांना हाताशी धरून सुमारे पाच टन बियाणे खाजगीत विकले असल्याची तक्रार गायगव्हाण (ता. सांगोला) येथील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रब्बी हंगामासाठी हेक्टरी एक क्विंटलप्रमाणे गहू बियाणे मोफत वितरित करण्यासाठी सुमारे पाच टन बियाणे कृषी कार्यालयास प्राप्त झाले होते. मोफत गहू बियाणे वाटपासाठी गायगव्हाण या गावाची निवड करण्यात आली होती. रब्बी हंगामाच्या शेवटी सुमारे एक महिन्यापूर्वी हे सर्व पाच टन बियाणे कृषी सहायक आर. एम. गायकवाड यांनी ठराविक दलालामार्फत गायगव्हाण गावात पाठविले. या योजनेची कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामपंचायत अथवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत गावातील शेतकर्‍यांनी देण्यात आली नाही. मंडल कृषी अधिकारी गस्ते, कृषी सहायक आर.एम.गायकवाड, कृषी पर्यवेक्षक वाघमोडे या सर्वांनी संगनमत करून गायगव्हाण येथील दलालास हाताला धरून हे सर्व बियाणे ठराविक एक-दोघा शेतकर्‍यांनाच विकले आहे. ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचू नये, याची खबरदारी यांनी घेतली होती.
या योजनेची माहिती समजल्यानंतर येथील शेतकर्‍यांनी महुद मंडल कृषी कार्यालयाकडे धाव घेतली व विचारणा केली. शिवाय बियाणे वाटप कोणत्या निकषाने, कसे केले, लाभार्थी शेतकर्‍यांची यादी द्यावी अशी मागणी केली. मंडलाधिकारी गस्ते, कृषी सहायक गायकवाड यांची वारंवार भेट घेतली. मात्र दोघांनीही शेतकर्‍यांना अरेरावीची भाषा वापरून हकलून दिले.

-------------------------------------
अधिकार्‍यांकडून धमकी
लाभार्थी शेतकर्‍यांची यादी तुम्हाला देता येणार नाही व वारंवार तुम्ही मागणी केली तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर केस दाखल करीन असा उलट दम या अधिकार्‍यांनी दिला असल्याचे तक्रारदार राजेंद्र साळुंखे, कैलास देवकते, महावीर साळुंखे, संतोष पाटील, आकाश खांडेकर यांनी सांगितले.
---------------------------------
मोफत गहू वाटप योजनेचे बियाणे तालुक्यास उशिरा प्राप्त झाले, त्यामुळे इतर कोणत्याही मंडलमध्ये ही योजना राबविली नाही. महुद मंडलमध्ये शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी आम्ही राबविली. कृषी सहायक गायकवाड यांनी बियाणे वाटप योग्य केले आहे. मात्र शेतकर्‍यांची अजूनही तक्रार असल्यास त्याची चौकशी केली जाईल.
- गस्ते
महुद मंडल कृषी अधिकारी
-----------------------------------
शासनाच्या विविध योजना महुद मंडलमधील अधिकारी दलालांमार्फत राबवित असतात.बियाणे,खते,औषधे यासह इतर कोणत्याही वस्तू सामान्य शेतकर्‍यांना दिल्या जात नाहीत.ठराविक धनदांडगे शेतकरी,व्यापारी या योजनांचा लाभ घेतात.
- कैलास देवकते, महावीर साळुंखे
गायगव्हाण

Web Title: Distribution of seeds of five tonnes of seeds by brokers holding hand in hand; The demand for action against the guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.