करमाळा पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:43+5:302021-06-03T04:16:43+5:30

करमाळा : केंद्र सरकारच्या सप्त वर्षपूर्तीनिमित्त भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली करमाळा पोलीस स्टेशनमधील पोलिसांना ...

Distribution of masks and sanitizers to Karmala police | करमाळा पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

करमाळा पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

करमाळा : केंद्र सरकारच्या सप्त वर्षपूर्तीनिमित्त भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली करमाळा पोलीस स्टेशनमधील पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांचे हस्ते करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी वर्ग व होमगार्ड यांच्यासाठी १५० सॅनिटायझर बॉटल आणि १५० मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, माजी शहर उपाध्यक्ष मच्छिंद्र फंड, अक्षय भैया कुंभार, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे-पाटील, बाळा जाधव उपस्थित होते.

---

फोटो : ०२ करमाळा

करमाळ्यात पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप करताना गणेश चिवटे.

Web Title: Distribution of masks and sanitizers to Karmala police