ग्रामीण रुग्णालयात फ्रूट पॅकेज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST2021-02-17T04:27:35+5:302021-02-17T04:27:35+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव निमित्त डिलिव्हरी माता व रुग्णांना मिक्स फ्रूटचे पॅकेज देण्यात आले. यावेळी ग्रामीण ...

Distribution of fruit packages in rural hospitals | ग्रामीण रुग्णालयात फ्रूट पॅकेज वाटप

ग्रामीण रुग्णालयात फ्रूट पॅकेज वाटप

येथील ग्रामीण रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव निमित्त डिलिव्हरी माता व रुग्णांना मिक्स फ्रूटचे पॅकेज देण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी करजखेडे, डॉ अशोक राठोड यांनी राष्ट्रवादीचे पक्षाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष राम जाधव यांच्या हस्ते मिक्स फ्रूट कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष माणिक बिरादार, विधानसभा कार्याध्यक्ष सिद्धाराम जाधव, प्रा. भीमराव साठे, मराठा सेवा संघाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पडवळकर, मोहोन चव्हाण, दिगंबरराव डांगे, माधव मोरे, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष गणेश कांबळे, प्रथमेश चव्हाण, अल्पसंख्याकचे इस्माईल फुलारी, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. रोहन वायचळ, धनंजय देशपांडे, अलापूरे आदी उपस्थित होते.

फोटोओळ:

१६अक्कलकोट०१

अक्कलकोट येथे राष्ट्रवादी पक्षाकडून प्रसूती महिलांना फ्रूट पॅकेज वाटप करताना राम जाधव, सिद्धाराम जाधव, डॉ अशोक राठोड आदी.

Web Title: Distribution of fruit packages in rural hospitals