तिल्लेहाळमध्ये महिलांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST2021-06-11T04:16:11+5:302021-06-11T04:16:11+5:30

मंद्रूप-वडकबाळ मार्गावर वृक्षारोपण दक्षिण सोलापूर : मंद्रूप-वडकबाळ रस्त्यावर सेवालाल नगर येथे एक कुटुंब, एक झाड या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करण्यात ...

Distribution of foodgrains to women in Tillehal | तिल्लेहाळमध्ये महिलांना धान्य वाटप

तिल्लेहाळमध्ये महिलांना धान्य वाटप

मंद्रूप-वडकबाळ मार्गावर वृक्षारोपण

दक्षिण सोलापूर : मंद्रूप-वडकबाळ रस्त्यावर सेवालाल नगर येथे एक कुटुंब, एक झाड या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. ऑक्सिजन वाढवणारी झाडं लावण्यात आली आहेत. या मोहिमेत मोतीलाल राठोड, नामदेव कारभारी, माजी सभापती आप्पाराव कोरे, मोतीराम चव्हाण, सचिन चव्हाण, सावन चव्हाण, श्रीमंत पवार, हिरा पवार, फौजदार राजू राठोड, राजू पवार, अनिल राठोड, सुनील पवार, दिलीप चव्हाण, सुनील डान्सर, धीरज राठोड, अमोल राठोड उपस्थित होते.

लऊळमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारा

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात लऊळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आवारात किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेना, दलित युथ पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टी, मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ आणि ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने करण्यात आली. यावेळी ज्याेती क्रांती परिषदेचे माढा तालुकाध्यक्ष स्वप्नील जानराव, रिपब्लिकन पक्षाचे नीलेश जानराव, पँथर सेनेेचे दयानंद जानराव उपस्थित होते.

शंकर गायकवाड यांचा सत्कार

वैराग : गेल्या १२ वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणारे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचा शिराळे येथील नागरिकांच्या वतीने ११ हजार रोख स्वरुपात देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दयानंद चौधरी, समाधान पाटील, अक्षय मते, सूरज चौधरी, सुरेश चौधरी, विठ्ठल पाटील, मधुकर चौधरी, नीलेश चौधरी, राजेंद्र फराडे, अनिल सावंत, आबा तानवडे उपस्थित होते.

Web Title: Distribution of foodgrains to women in Tillehal