वृद्धाश्रमातील निराधारांना अन्नधान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:45+5:302021-09-06T04:26:45+5:30

राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या वतीने पाच हजार ...

Distribution of foodgrains to the destitute in the old age home | वृद्धाश्रमातील निराधारांना अन्नधान्य वाटप

वृद्धाश्रमातील निराधारांना अन्नधान्य वाटप

राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत वृद्धाश्रमाचे संस्थापक संचालक दशरथ महाडिक-देशमुख यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे, संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष नागनाथ महाडिक, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख, रामभाऊ मिटकल, शिवाजी गवळी, सचिव शंकर गवळी, नवनाथ दौड, सचिन महिंगडे, धनश्री ढवळे, आशा निमसे, शीला खटाले, सुवर्णा देशमुख, सचिन खुळे, शंकर नागणे, अजय गायकवाड, हरिभाऊ सटाले आदी उपस्थित होते.

............

चौकट

लोकांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे. अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून यापुढे ‘बुके नव्हे बूक’ देण्याचा संकल्प केल्याचे तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख यांनी सांगितले.

................

फोटो ओळ

टेंभुर्णी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने निराधारांना अन्नधान्य वाटप करताना तात्यासाहेब पाटील, सचिन जगताप, सुरजाताई बोबडे, नीलेश देशमुख आदी.

........

(फोटो ०२टेंभुर्णी मराठा सेवा संघ)

Web Title: Distribution of foodgrains to the destitute in the old age home