संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:01+5:302021-02-05T06:47:01+5:30

कुर्डूवाडी : मराठा सेवा संघाच्या वतीने पालवण (ता.माढा) येथील मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ...

Distribution of enlightening books on the occasion of Sant Tukaram Maharaj's birthday | संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप

संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप

कुर्डूवाडी : मराठा सेवा संघाच्या वतीने पालवण (ता.माढा) येथील मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी पालवण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सार्वकालिक संत तुकाराम महाराज, महानायिका, प्रबोधनातून मुल्यशिक्षण, राष्ट्रमाता जिजाऊ जीवन चरित्र, पुरूषोत्तम खेडेकर लिखित बालशिक्षण, जिजाऊंची शिकवण, तुकोबा ते शिवबा ही प्रबोधनात्मक पुस्तके मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, माढा तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख, पालवणचे माजी सरपंच परमेश्वर पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यावेळी संत तुकाराम महाराजांचे निस्सीम भक्त छगन रंदवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब रंदवे, पोलिस पाटील संजय मदने, प्रशांत ओहोळ, रमेश लोंढे उपस्थित होते.

............

फोटो- ०२ कुर्डूवाडी स्कूल

संत तुकाराम महाराजांच्या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप् करताना तात्यासाहेब पाटील, नीलेश देशमुख, परमेश्वर पाटील

Web Title: Distribution of enlightening books on the occasion of Sant Tukaram Maharaj's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.