भाजयुमोच्या बैठकीत संघटनात्मक वाढीसाठी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:52+5:302021-09-24T04:25:52+5:30

भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर विक्रांत पाटील यांचा हा जिल्ह्यातील पहिलाच दौरा होता. यावेळी त्यांनी युवा मोर्चाच्या ...

Discussions for organizational growth at the BJP meeting | भाजयुमोच्या बैठकीत संघटनात्मक वाढीसाठी चर्चा

भाजयुमोच्या बैठकीत संघटनात्मक वाढीसाठी चर्चा

भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर विक्रांत पाटील यांचा हा जिल्ह्यातील पहिलाच दौरा होता. यावेळी त्यांनी युवा मोर्चाच्या संघटनात्मक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. युवा मोर्चासोबतच युवा वाॅरियर्स, विद्यार्थी विभाग, युती विभाग यांनाही बरोबर घेतले पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला.

यावेळी करमाळ्याचे दीपक चव्हाण व माळशिरसचे सुजितकुमार थेटे यांची भाजयुमोच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल व अमृत मारणे यांची युवा वॉरियर्सच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीला भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, युवा मोर्चा पंढरपूरचे सुनील भोसले, माढ्याचे उमेश पाटील, अक्कलकोटचे दयानंद बमनळी, माढ्याचे गिरीश तांबे, विजय कोकाटे, नागनाथ वाघे, भाऊसाहेब महाडिक, नानासाहेब देशमुख, आकाश देशमुख, रमेश टिपाले, विनायक लोंढे, सुशांत हजारे, ऋषिकेश लोणारी, सुदर्शन यादव, गिरीष तांबे यांच्यासह जिल्हा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

230921\img-20210921-wa0016.jpg

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा सत्कार करताना योगेश बोबडे,गिरीष ताबे आदि.

Web Title: Discussions for organizational growth at the BJP meeting