शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सोलापूरातील ‘मेगा पॉवरलूम क्लस्टर’ साठी तीन जागांचा पर्याय, होटगी तलाव, कुंभारी, कुमठे येथील जागांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 11:48 IST

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात उभारण्यात येणाºया मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी जिल्हा प्रशासनाने वस्त्रोद्योग विभागासमोर होटगी, कुंभारी, कुमठे येथील जागांचे पर्याय ठेवले आहेत. येथील जमिनींची पाहणी करून प्रशासनाला कळविण्याची सूचना करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देयंत्रमागधारक कुंभारी येथील जागेसाठी आग्रही ‘अटल सोलर’साठी हवेत आणखी प्रस्तावशेतकºयांना तीन लाख रुपयांचा सोलर कृषीपंप देण्यात येणारजिल्ह्यासाठी २१० सोलर कृषीपंप मिळणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात उभारण्यात येणाºया मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी जिल्हा प्रशासनाने वस्त्रोद्योग विभागासमोर होटगी, कुंभारी, कुमठे येथील जागांचे पर्याय ठेवले आहेत. येथील जमिनींची पाहणी करून प्रशासनाला कळविण्याची सूचना करण्यात आली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, महसूल विभागाच्या प्रधान सचिवांची नुकतीच मंत्रालयात बैठक झाली होती. तीत सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. वस्त्रोद्योग विभागाचे सहायक संचालक किसन पवार, प्रादेशिक उपसंचालक राजेंद्र ढंगे, यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, श्रीनिवास बुरा, राजेश गोस्की आदी उपस्थित होते. या बैठकीत होटगी तलावाजवळ असलेली जलसंपदा विभागाची जमीन, कुमठे येथील गायरान जमिनीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले. कुंभारी येथे २५० एकर जागेवर एमआयडीसी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील जागेचा विचार करून अहवाल सादर करण्याचे ठरले. तीनपैकी एक जागा मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी मिळणार आहे. यंत्रमागधारक कुंभारी येथील जागेसाठी आग्रही आहेत. ------------------‘अटल सोलर’साठी हवेत आणखी प्रस्ताव- अटल सोलर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून ५ एकरांच्या आत जमीन असलेल्या शेतकºयांना तीन लाख रुपयांचा सोलर कृषीपंप देण्यात येणार आहे. महावितरणच्या अधिकाºयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्ह्यासाठी २१० सोलर कृषीपंप मिळणार आहेत. आजवर ५० प्रस्ताव आले आहेत. आणखी प्रस्ताव दाखल व्हावेत यासाठी काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. या योजनेतून ३ एचपीच्या कृषीपंपासाठी सव्वातीन लाख रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ९७ हजार रुपयांचे तर राज्य सरकारकडून १६००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्यांनी ५ टक्के म्हणजेच जवळपास १६ हजार रुपये भरायचे आहेत. उर्वरित २ लाख रुपयांच्या आसपासची रक्कम कर्जाने मिळेल. या कर्जाचे हप्ते महावितरणच भरणार आहे. ------------------५० एकरांहून अधिक जागेची गरज मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी ५० एकरांहून अधिक जागा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने तीनपैकी एका जागेची निवड करा, असे सुचविले आहे. लवकरच जागेची पाहणी करणार आहोत. - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ, सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख