अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाबाबत चर्चा

By Admin | Updated: May 3, 2014 14:45 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:45:58+5:30

तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर विकासाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांनी सांगितले.

Discussion about the development of the holy city of Akkalkot | अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाबाबत चर्चा

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाबाबत चर्चा

अक्कलकोट: तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर विकासाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांनी सांगितले.
भाजपाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासमवेत वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी, १३ वा वित्त आयोग, तीर्थक्षेत्र प्राधिकरण, पंढरपूर, तुळजापूर या धर्तीवर अक्कलकोटलाही अनुदान मिळावे तसेच शहर हद्दीतील राज्यमार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून रस्ता बांधणी काम तत्काळ मार्गी लावावे याबाबत ३० मिनिटे सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी मुख्याधिकारी एम. के. पाटील, बांधकाम विभागाचे मलिक बागवान उपस्थित होते.
चौकट
तीर्थक्षेत्र योजनेतून घेण्यात येणार्‍या कामासाठी २० टक्के निधीचा मुद्दा मांडताना १ कोटी १७ लाखांचा निधी १३ व्या वित्त आयोगातून देण्याबरोबर यात्रा अनुदान प्राधिकरण राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुन रस्ता बांधणीबाबतचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देऊन सविस्तर चर्चा केली. हे प्रश्न तत्काळ मार्गी लागतील, असेही खेडगी यांनी सांगितले.

Web Title: Discussion about the development of the holy city of Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.