माढा राष्ट्रवादी युवकच्या वतीने सवलतीत पिठाची गिरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:30+5:302021-07-07T04:27:30+5:30

भीमानगर : माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पिठाची गिरणी व आरो फिल्टरचे वितरण करण्यात आले. ...

Discounted flour mill on behalf of Madha Nationalist Youth | माढा राष्ट्रवादी युवकच्या वतीने सवलतीत पिठाची गिरणी

माढा राष्ट्रवादी युवकच्या वतीने सवलतीत पिठाची गिरणी

भीमानगर : माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पिठाची गिरणी व आरो फिल्टरचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते पिठाची गिरणी आणि आरो फिल्टर वाटप करण्यात आले. कोरोनाकाळात पिण्याचे शुद्ध पाणी आणण्यासाठी आणि दळण दळायला महिलांना बाहेर जावे लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक अध्यक्ष संभाजी पाटील आणि त्यांच्या समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला. या उपक्रमासाठी माढा विधानसभा संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, जिल्हा परिषद सदस्य बंडू ढवळे, झेडपी सदस्य शिवाजीराव पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग घाडगे, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, पंचायत समितीचे उपसभापती धनाजी जवळगे, संतोष अण्णा पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन हरिदास पाटील, सरपंच कांतीलाल नवले, महादेव घाडगे, किसन घाडगे, प्रकाश घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष अनिल तोडकर, सचिन पाटील, ॲड. रंजित पाटील, आकाश पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे, कार्याध्यक्ष रामराजे नलवडे, उपाध्यक्ष राम नवले, हनुमंत चव्हाण, सचिन होदाडे, संजय मिस्कीन, विठ्ठल मिस्कीन, दिगंबर फाळके, सचिन लोंढे, निखिल मोरे, संतोष लोंढे, संतोष चव्हाण, सज्जन पाटील, शीतल लोंढे, जगताप मॅडम, ऋतुजा सुर्वे, अविदा खरे, मयूरी शिंदे, तानाजी लोंढे, निखिल गिड्डे, भजनदास गायकवाड, समीर मुलाणी, काकासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रशांत गायकवाड, महादेव ढगे, प्रदीप पाटील सर, मेघराज पाटील उपस्थित होते.

----

फोटो : ०५ भीमा नगर

माढा राष्ट्रवादी युवकच्या वतीने सवलतीत पिठाची गिरणी वाटप करताना रणजितसिंह शिंदे, रमेश पाटील, रामभाऊ शिंदे, दिलीपराव भोसले, बंडू ढवळे, शिवाजीराव पाटील, पांडुरंग घाडगे, प्रमोद कुटे.

Web Title: Discounted flour mill on behalf of Madha Nationalist Youth