शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! दौंडचा विसर्ग वाढला; उजनी धरण रविवारपर्यंत येणार प्लसमध्ये

By appasaheb.patil | Updated: July 26, 2023 15:29 IST

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग वाढला आहे.

सोलापूर : सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळी वाढ झाल्याचा आलेख दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरातील पाणीकपात व पाणीटंचाईची भिती आता धूसर झाल्याचे म्हणावे लागेल. 

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग वाढला आहे. सध्या उजनी धरणात दौंडमधून २४ हजार क्सुसेकचा विसर्ग सुरू आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाची पाणीपातळी वजा १९ टक्के एवढी आहे. उजनीच्या पाणीपातळीत घट झाल्याने महापालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी दुबार पंपिंग करावे लागले मात्र पाणीपुरवठ्यात वाढ झाल्यानंतर महापालिकेने दुबार पंपिंग बंद केले.

सध्या उजनी धरणात ५३.८९ टीएमसी पाणीसाठा असून धरण १२.३ टक्के मायनसमध्ये आहे. खडकवासला धरण ८८ टक्के भरल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळी दररोज वाढ होत असल्याचा आलेख दिसून येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी