पाच हजार किलोमीटरचे अंतर पार करतायेत दिव्यांग शिक्षक; जोधपूरवरुन सोलापुरात दाखल
By शीतलकुमार कांबळे | Updated: May 27, 2024 19:05 IST2024-05-27T19:05:10+5:302024-05-27T19:05:27+5:30
जगदीश लोहार यांचा प्रवास २० दिवसांचा आहे. या दरम्यान ते स्वता दुचाकी दुरुस्त करतात.

पाच हजार किलोमीटरचे अंतर पार करतायेत दिव्यांग शिक्षक; जोधपूरवरुन सोलापुरात दाखल
सोलापूर : जोधपूरमधील केंद्रीय विद्यालयातील शिक्षक जगदीश लोहार हे दिव्यांग आहेत. दिव्यांग बांधवांबाबत जागृती करण्यासाठी ते काम करतात. याच उद्देशाने जोधपूरवरुन कन्याकुमारीला त्यांच्या तीनचाकी स्कूटीवरुन जात आहेत. ५ हजार ५०० किलोमीटरचे अंतर ते पार करत आहेत. त्यांच्या या प्रवासात सोमवार २७ मे रोजी ते सोलापुरात होते.
जगदीश लोहार यांचा प्रवास २० दिवसांचा आहे. या दरम्यान ते स्वता दुचाकी दुरुस्त करतात. यापुर्वी त्यांनी भारतातील तीन दिशांना यात्रा केल्या आहेत. आता देशाच्या चौथ्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु आहे. जगदीश लोहार हे १० वर्षांपासून दिव्यांगांसाठी काम करत आहेत. त्यांनी दिव्यांग व्यक्तींना कार घेण्यासाठी सूट मिळावी म्हणून प्रयत्न केले. यासोबतच वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दिव्यांगासाठी अनुकूल मॉडेल बनविण्यासाठी ते जागृती करत आहेत.
लोहार हे दर २५०० किलोमीटर नंतर सर्विसिंग करतात. सोलापूरात आल्यानंतर २५०० किलोमीटर पूर्ण झाले. त्यामुळे जोधपूरनंतर सोलापुरात त्यांनी गाडी सर्व्हिसिंग करुन घेतली. जगदीश लोहार यांचा प्रवास २० दिवसांचा आहे. या दरम्यान ते स्वता दुचाकी दुरुस्त करतात.