शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

विठ्ठलाच्या भेटीसाठी पावसातही चिंब भिजत पंढरी गाठणारी सायकल दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:54 IST

यंदाचे एकविसावे वर्ष : ओंकारेश्वर ते पंढरपूर ७५० किलोमीटरचा प्रवास

ठळक मुद्दे१९९२ साली अवघ्या दोघांनी सुरू केलेली ही वारी आज अकरा जणांची सर्वजण पन्नाशीच्या पुढचे आहेत.गावकरी आर्थिक मदत करतातयंदाच्या प्रवासात चार मोठे तर पाच ते सहा हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत आतापर्यंत प्रवास केल्याचे सहभागी दिंडीकºयांनी यांनी सांगितले

यशवंत सादूल 

पंढरपूर  : विठ्ठलाच्या भक्तिरसासोबत अधूनमधून पडणाºया पावसात चिंब भिजत सायकलवरून प्रवास करणारे वारकरी. सातशे ते साडेसातशे किलोमीटरचा रस्ता पार करीत दर आषाढीला पंढरी गाठतात. पन्नाशी आणि त्यापुढील वयाचे हे सर्व विठ्ठलभक्त असून, ते खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर या छोट्याशा खेड्यातील आहेत. यंदा त्यांचे एकविसावे वर्ष आहे. पंढरीच्या वाटेवर असलेल्या या सायकल दिंडीची भेट मोहोळ ते पंढरपूर मार्गावरील सारोळे गावानजीक झाली.

सायकलला बांधलेल्या छोट्याशा लाऊडस्पीकरवरून माझे माहेर पंढरी... सावळ्या विठ्ठला़़़ यासारखी भाव आणि भक्तिगीते वाजवित रांगेने येणारे अनोखे वारकरी. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर ते पंढरपूर जवळपास साडेसातशे किलोमीटर अंतर पार करीत दरवर्षी आषाढीला पंढरीला येणारे हे वारकरी. मागील एकवीस वर्षांपासून त्यांची ही सायकल दिंडी अखंडपणे चालू आहे. या दिंडीतील सर्व वारकरी हे पन्नास व त्यापुढील वयोगटाचे असून, त्यांचा उत्साह मात्र तरुणांसारखा आहे. त्यातील बहुतेक जण शेतकरी, शेतमजूर आहेत तर काही भेळ, चणेफुटाणे विके्रते आहेत. पासष्ट वर्षांचे दशरथ महाराज भोईराज हे दिंडीचे प्रमुख असून, सर्वात पुढे सायकलवर होते. त्यांच्यासोबत संजय महाजन, आबेद भोई, कैलास भोई, गोविंद भोई, सुनील महाजन, काळू भैरी, अनिल जंजाळकर, प्रभाकर पाटील, गोकुळ राजपूत हे सदस्य होते.

ओंकारेश्वर येथून २६ जून रोजी ही सायकल दिंडी निघाली. पुढे रावेर ते जामनेर, भोकरदन, कपिलधार, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर, सुरतगाव फाटा, मोहोळमार्गे सातशे पन्नास किलोमीटरचा सायकल प्रवास अकरा दिवसांमध्ये पूर्ण करून पंढरीत पोहचत आहे. यामध्ये नऊ ठिकाणी मुक्काम केला आहे. दररोज सरासरी ७५ ते ८० किलोमीटर अंतर कापले जाते. पहाटे सहा वाजता निघाले की ४० किलोमीटर अंतरावरील गावात जेवण व विश्रांतीसाठी थांबले जाते. सायंकाळच्या सत्रात पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर कापले जाते. रात्रीचा मुक्काम त्या गावातील मंदिरात केले जाते. सायकलचालक हे पंक्चर व इतर रिपेअरी स्वत: करतात़ सर्व साहित्य सोबतच असते. पंढरपूरला सद्गुरू दिगंबर मठात त्यांचा मुक्काम असतो. एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माघारी फिरतात. त्यांचा परतीच्या प्रवासाचा मार्ग मात्र दुसराच आहे. पंढरपूरहून टेंभुर्गी, करमाळा मार्गे नगरला जातात. शनिशिंगणापूर, शिर्डीचे दर्शन घेऊन कोपरगाव, चाळीसगावमार्गे जळगाव आणि ओंकारेश्वरला जातात. 

 पाऊस आला तरी थांबणे नाही...- एका मुक्कामाच्या ठिकाणाहून सायकलवर स्वार झाल्यावर कितीही जोराचा पाऊस आला तरी दिंडीतील एकही जण थांबत नाही. पावसात चिंब भिजत विठुनामाचा जयघोष करीत आलेल्या पावसाचे स्वागत करीत दिंडी पुढेच सरकते. मुक्कामाच्या ठिकाणीच थांबते. यावेळी अंगात वेगळीच ऊर्जा संचारते असा त्यांचा अनुभव आहे. यंदाच्या प्रवासात चार मोठे तर पाच ते सहा हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत आतापर्यंत प्रवास केल्याचे सहभागी दिंडीकºयांनी यांनी सांगितले. 

१९९२ साली अवघ्या दोघांनी सुरू केलेली ही वारी आज अकरा जणांची आहे. सर्वजण पन्नाशीच्या पुढचे आहेत.गावकरी आर्थिक मदत करतात.इच्छुकांची संख्या वाढली असली तरी आम्ही मर्यादा ठरविली आहे. दरवर्षीची ही आमची आनंद वारी असून, अमर्याद आनंद मिळतो. -दशरथ महाराज भोईराज, सायकल दिंडीप्रमुख, रावेर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाJalgaonजळगाव