विलास जळकोटकर सोलापूर दि १३ : राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरु असलेली ‘गाव तेथे एस. टी.’ या प्रवासी सेवेचा उपक्रम अधिक गतिमान व्हावा आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी महामंडळाने राज्यभर वेबपेजद्वारे रोडवर धावणारी बस नेमकी कोठे आहे, तिची काय स्थिती आहे, प्रवासी सेवा सुलभ होत आहे काय? यासह बारीक तपशिलासह मुख्यालयात राहून लोकेशन तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मुख्य विभाग आणि जिल्ह्यातील आगारांमध्ये या डिजिटल यंत्रणेचा कंट्रोल आहे. विभागातून असो वा जिल्ह्यातील आगारातून सुटणारी बस कोणत्या मार्गावर आहे, चालक-वाहक कोण आहेत, प्रवासी संख्या, सुरुवातीचे आणि शेवटचे तिकीट केव्हा काढले, पुढील थांबा येईपर्यंत त्याची परिपूर्ती झाली काय? यासह एखाद्या मार्गावर बस थांबून राहिली आहे काय यासह सबंध माहिती या वेबपेजद्वारे अधिकाºयांना समजणे सुलभ झाले आहे. राज्यभरातील माहिती एकाच ठिकाणाहून तपासण्याची यंत्रणा यामध्ये कार्यान्वित केली आहे. महामंडळातील संबंधित जबाबदार अधिकाºयांना यासंदर्भात वेबपेजचा आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. जीपीआरएसशी कनेक्ट यंत्रणा असून, याचा वापर महामंडळाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी होत असल्याचे जिल्हा वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.या यंत्रणेद्वारे विभागवाईज माहिती संकलित करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती मुख्यालयाच्या ठिकाणी मिळते. ग्रामीण भागात इंटरनेटच्या विस्कळीत सेवेमुळे ही सुविधा फारशी चालत नसली तरी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर यासह लांब पल्ल्याच्या हायवेवर ही यंत्रणा यशस्वीपणे सुरु आहे. त्याचा परिणामही चांगला जाणवत असल्याचे जानराव यांनी स्पष्ट केले.---------------गतिमान यंत्रणेसाठी उत्तम सुविधा- बदलत्या काळानुसार प्रवाशांना तत्पर सेवा दिल्याशिवाय तो आकर्षित होणार नाही, हे गृहित धरुन शासनाकडून डिजिटल यंत्रणेचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे कामचुकारपणा अथवा विस्कळीत सेवा घडत असल्यास ती लागलीच मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाºयांना समजणार आहे. त्या दृष्टीने पुढील कार्यवाही होऊन यंत्रणा अधिक गतिमान होण्यास मदत होत असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांनी स्पष्ट केले.----------------सीसीटीव्ही काम अंतिम टप्प्यात- बसस्थानकावरील सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने सोलापूर विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर, पंढरपूर आणि अक्कलकोटचा समावेश आहे. सोलापूर बसस्थानकावर २२ कॅमेरे बसवण्यात येत आहेत, पंढरपूर जुने बसस्थानक २२ आणि नवीन बसस्थानक येथे २२ तर अक्कलकोटला ५ कॅमेरे बसवले जात आहेत, यापूर्वी ८ कॅमेरे येथे बसवले आहेत, दुसºया टप्प्यात अन्य आगारामध्ये हे काम चालणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर ही कार्यवाही सुरु असून, अप्रोआॅन कंपनीला याचे टेंडर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर एसटी विभागाची डिजीटल यंत्रणा, मुख्यालयातून रोडवरील बसच्या लोकेशनची तपासणी करणार, तत्पर सेवा अन् अनिष्ठ प्रकारांवर निर्बंधासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:13 IST
राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरु असलेली ‘गाव तेथे एस. टी.’ या प्रवासी सेवेचा उपक्रम अधिक गतिमान व्हावा आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी महामंडळाने राज्यभर वेबपेजद्वारे रोडवर धावणारी बस नेमकी कोठे आहे, तिची काय स्थिती आहे, प्रवासी सेवा सुलभ होत आहे काय? यासह बारीक तपशिलासह मुख्यालयात राहून लोकेशन तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मुख्य विभाग आणि जिल्ह्यातील आगारांमध्ये या डिजिटल यंत्रणेचा कंट्रोल आहे.
सोलापूर एसटी विभागाची डिजीटल यंत्रणा, मुख्यालयातून रोडवरील बसच्या लोकेशनची तपासणी करणार, तत्पर सेवा अन् अनिष्ठ प्रकारांवर निर्बंधासाठी उपाययोजना
ठळक मुद्दे राज्यभरातील माहिती एकाच ठिकाणाहून तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित बसस्थानकावरील सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने सोलापूर विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात बदलत्या काळानुसार प्रवाशांना तत्पर सेवा दिल्याशिवाय तो आकर्षित होणार नाही, हे गृहित धरुन शासनाकडून डिजिटल यंत्रणेचा वापर करण्यास प्रारंभ केला