झोपण्यासाठी आंथरूण टाकताना झाली अडचण; रूग्णाचा भाऊ असलेल्या पोलिसाला मारहाण
By संताजी शिंदे | Updated: August 20, 2023 19:22 IST2023-08-20T19:22:17+5:302023-08-20T19:22:21+5:30
अश्विनी हॉस्पिटलमधील प्रकार : अज्ञान पाच जणांविरूद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा

झोपण्यासाठी आंथरूण टाकताना झाली अडचण; रूग्णाचा भाऊ असलेल्या पोलिसाला मारहाण
सोलापूर : अश्विनी हॉस्पिटलमध्ये झोपण्यासाठी आंथरूण टाकत असताना झालेल्या वादातून रूग्णाचा भाऊ असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १६ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० ते १०.१३ दरम्यान घडला.
हिदायतउल्ला वजुद्दीन मुलाणी (रा. अरविंद धाम, पोलिस वसाहत) यांची बहिण अजारी असल्याने अश्विनी रूग्णालयात ॲडमीट असून उपचार घेत आहे. रात्रीच्या सुमारास हिदायतउल्ला मुलाणी हे हॉस्पिटलमध्ये गेले. ते रात्री तेथीलच आय सी यु समोरील विश्राम कक्षेत नातेवाईकांसोबत बाकड्या जवळ बसले होते. दरम्यान तेथे एक अज्ञात व्यक्ती बाकड्या जवळ आला व झोपण्यासाठी आंथरून घालू लागला. आंथरून घालत असताना हिदायतउल्ला मुलाणी व अज्ञात इसमामध्ये शाब्दीक चकमक झाली.
अज्ञात व्यक्ती हुज्जत घालून शिवीगाळ करू लागला, दरम्यान त्याने मोबाईलवर फोन करून आणखी चार साथीदाराला बोलावून घेतले. आय.सी.यू. समोर सर्वांनी हिदायतउल्ला मुलाणी यांना तोंडावर व अंगावर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ दोन दाताला मार लागला व जखमी झाले. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस हवालदार आनंद कंच्चे करीत आहेत.