मासे धरण्यासाठी गेलेल्या इसमाचा जलपर्णीत अडकून मृत्यू

By Admin | Updated: May 7, 2014 22:46 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T22:46:39+5:30

सांगोला : तलावात मासे धरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पोहता येत असतानासुद्धा गवत व जलपर्णीमध्ये अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सांगोला तालुक्यातील राजुरी येथे बुधवारी सकाळी घडली़ रावसाहेब पांडुरंग चव्हाण (४७, रा. पाचेगाव-खुर्द) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Died to the fish trapped in the fishing boat | मासे धरण्यासाठी गेलेल्या इसमाचा जलपर्णीत अडकून मृत्यू

मासे धरण्यासाठी गेलेल्या इसमाचा जलपर्णीत अडकून मृत्यू

सांगोला : तलावात मासे धरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पोहता येत असतानासुद्धा गवत व जलपर्णीमध्ये अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सांगोला तालुक्यातील राजुरी येथे बुधवारी सकाळी घडली़ रावसाहेब पांडुरंग चव्हाण (४७, रा. पाचेगाव-खुर्द) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चव्हाण हे आपल्या मित्रासमवेत बुधवारी राजुरी गावापासून २ किमी अंतरावरील तलावात मासे धरण्यासाठी गेले होते. चव्हाण मासे धरण्याचे जाळे तलावात टाकत असताना तोल जाऊन पाण्यात पडले. तलावात मोठ्या प्रमाणात गवत व जलपर्णी असल्याने पोहता येत असतानासुद्धा ते अडकून पाण्यात बुडून मरण पावले. आजूबाजूच्या गावातील लोकांनी २ तासाच्या अथक प्रयत्नानंतर चव्हाण यांचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची पोलिसात आकस्मात नोंद झाली असून, तपास हवालदार अभिमान गुटाळ करीत आहे.

Web Title: Died to the fish trapped in the fishing boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.