शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

संवाद : अकरा महिने मृत्यूशी झुंजलो; ‘गेमप्लॅन’चा छडा लावाच : सुरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:34 IST

सुरेश पाटलांचा ‘लोकमत’शी संवाद: चालता येत नसले तरी पालिकेत एन्ट्री करणारच

ठळक मुद्देसुरेश पाटील मित्रपरिवारातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या सीआयडी चौकशीचे काय झाले? माझा ‘गेमप्लॅन’ करणाºयांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया नगरसेवक सुरेश पाटील यांनी  ‘लोकमत’शी दिली.

राजकुमार सारोळे 

सोलापूर : थेलीयमचा विषप्रयोग करून मला संपविण्याचा प्रयत्न केला गेला, पण माझे कुटुंब व मित्रपरिवाराच्या पाठबळाने ११ महिने मृत्यूशी झुंज दिली. आता  एकच मागणी आहे ती म्हणजे माझा ‘गेमप्लॅन’ करणाºयांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया नगरसेवक सुरेश पाटील यांनी  ‘लोकमत’शी दिली. 

सुरेश पाटील मित्रपरिवारातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या सीआयडी चौकशीचे काय झाले? या प्रकरणातील खरे गुन्हेगार शोधून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.  ५ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी महापालिकेतून घरी परतल्यावर त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यानंतर काय घडले याबाबत पाटील यांच्या तोंडून घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला. पायाला मुंग्या येत आहेत  म्हणून शुगरमुळे पॅरेलेसीसची लक्षणे असावीत असा अंदाज करून  त्याप्रमाणे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण फरक न पडता जुलाब होऊन पाय लुळे पडल्याने आजार वाढत गेला. डॉक्टर म्हणाले की मी यातून वाचणे शक्य नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. येथेही त्याचपद्धतीने उपचार सुरू राहिल्याने प्रकृती आणखी चिंताजनक बनत गेली. तेथून पुन्हा मुंबईला हलविण्यात आले. 

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आजाराचे खरे निदान झाले. द्रव्य पदार्थातून थेलीयम देण्यात आल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या माहितीवरून पोलिसांनी एमएलसी नोंद केली. शरीरात नसानसात भिनलेले थेलीयम बाहेर काढण्यासाठी सहा महिने गेले. मी संपलो अशी चर्चा होती. या काळात अनंत यातना मला सहन कराव्या  लागल्या. माझा मुलगा बिपीन, पुतण्या अक्षय आणि पत्नी उषा रात्रंदिवस माझी सेवा करीत होते. कितीतरी दवाखाने बदलले. मी यातून वाचेन असे कोणालाही वाटत नव्हते. पण आज मी यातून बाहेर पडलो आहे. आता मला फक्त चालता येत नाही. त्यासाठी फिजीओथेरपी सुरू आहे. मला विश्वास आहे की मी पुन्हा त्याच ताकदीने महापालिकेत एन्ट्री मारेन.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडी तपासाची घोषणा केली. पण पुढे काय तपास झाला माहीत नाही. 

मित्रमंडळींचा आज मोर्चासुरेश पाटील यांना न्याय द्यावा या मागणीसाठी मित्रमंडळींतर्फे बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा भवानीपेठेतील पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून जय भवानी मैदान, बलिदान चौक, सराफ कट्टा, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. 

केस, नखामुळे झाले निदान- बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान विषबाधेचा प्रकार उघड झाला. डॉक्टर विविध चाचण्या करीत होते. माझ्या डोक्याचे केस गळत आहेत.   बोटांच्या नखांचा रंग बदललेला पाहून डॉक्टरांचा संशय बळावला. त्यामुळे केस आणि नखे काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविली. पहिली चाचणी पॉझीटीव्ह आल्यावर पुन्हा एकदा खात्री करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी माझ्यावर थेलीयमचा विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगितले. 

थेलीयम आले कोठून ?थेलीयम हे विषारी द्रव्य सहसा बाजारात उपलब्ध होत नाही. अत्यंत शांत डोक्याने व योजनाबद्ध रितीने हा कट रचला गेला असावा असे मला वाटते. त्यामुळे थेलीयम सोलापुरात कसे आले याचा शोध जर पोलिसांनी घेतला तर प्रकरण धसास लागेल, अशी सुरेश पाटील यांची मागणी आहे. अकरा महिन्यांत माझे कुटुंब डिस्टर्ब झाले. ९0 लाख खर्च झाले. 

पोलीस म्हणाले जबाब द्यामुख्यमंत्री सोलापूर दौºयावर असताना पोलीस माझ्याकडे आले व  जबाब द्या म्हणून आग्रह धरला. अद्याप माझी मानसिकता नाही असे म्हटल्यावर तसे लिहून द्या म्हणत होते. मी बरा होत आहे. योग्य वेळ आली की सर्व माहिती सांगेन असे पोलिसांना सांगितल्याचे सुरेश पाटील म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका