शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब सर्वात पुढे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 12:57 IST

सोलापूर : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्यूमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका ...

सोलापूर : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्यूमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक असतो. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब सर्वात पुढे असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै ते सप्टेंबर दरम्यान रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचा आकडाही वाढला. त्यानंतर मात्र कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा अल्पायुषी ठरला असून, फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यापासून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नेमके कोणत्या कारणाने मृत्यू होत आहेत यामागील कारणे आरोग्य विभागाने जाणून घेतली असता मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

कोरोनाशिवाय अन्य कोणताही आजार नसलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, न्यूमोनिया, हृदयविकार, किडनी आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडणे, कुणाच्याही संपर्कात न येणे, नियमित औषधोपचार घेणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

वेळीच निदान व उपचार मिळाले तर रुग्ण या आजारातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येताच तातडीने कोरोना चाचणी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?

कोरोनाकाळात प्रत्येक व्यक्तीने आरोग्याप्रति जागरूक राहणे ही काळाची गरज ठरत आहे. विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांच्या संपर्कात येऊ नये. घरात वयोवृद्ध आई-वडील, व्याधीग्रस्त नागरिक असतील तर युवा वर्गानेदेखील आपल्यापासून घरातील ज्येष्ठांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

 

  • एकूण मृत्यू - १४८९
  • उच्च रक्तदाब - २६८
  • मधुमेह - २९३
  • उच्चरक्तदाब मधुमेह - २५३
  • उच्चरक्तदाब मधुमेह हृदय विकार - ८८
  • उच्चरक्तदाब हृदय विकार- ७८
  • हृदय विकार - ९९
  • मूत्रपिंडाचे विकार - ४७
  • फुफ्फुसाचे विकार - २१
  • लठ्ठपणा - २३
  • एचआयव्ही- २
  • ६० वर्षांपुढील- १०२९
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल