पाथरीजवळ धूम स्टाईल चोरी : चालत्या टेम्पोतून ९३ हजारांचे साबण गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST2021-05-14T04:22:11+5:302021-05-14T04:22:11+5:30

टेम्पो चालक तुकाराम प्रभू दराडे (वय ३०, रा लिंबेवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) हा फुरसुंगी पुणे येथून आयशर ...

Dhoom style theft near Pathri: 93,000 soaps disappear from walking tempo | पाथरीजवळ धूम स्टाईल चोरी : चालत्या टेम्पोतून ९३ हजारांचे साबण गायब

पाथरीजवळ धूम स्टाईल चोरी : चालत्या टेम्पोतून ९३ हजारांचे साबण गायब

टेम्पो चालक तुकाराम प्रभू दराडे (वय ३०, रा लिंबेवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) हा फुरसुंगी पुणे येथून आयशर टेम्पो (नंबर एमएच २४ ए.यू १३८७) यामध्ये गोदरेजच्या साबणाचे ५८५ व गुड नाईटचे १४ बॉक्स सामान भरून अंबेजोगाई व उदगीर येथे जात असताना कुसळंब- रमाळा रोडचे आणि पुलाचे काम चालू असल्याने वाहने सावकाश येतात. याचा फायदा घेत चोरटयांनी टेम्पोवर चढून ताडपत्री फाडून टेम्पोतील ९३ हजार ६०० रुपयांचे साबण लंपास करून पोबारा केला.

पोलीस नाकाबंदी करीत असलेल्या ठिकाणी टेम्पो उभा करून पाहिले असता ताडपत्री कापलेली दिसली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. टेम्पो चालक तुकाराम प्रभू दराडे यांनी तक्रार दिली असून, बार्शी तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र मंगरुळे करीत आहेत.

----

---

Web Title: Dhoom style theft near Pathri: 93,000 soaps disappear from walking tempo