धीरज कदम पाटील यांची अन्नछत्रला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:04+5:302020-12-30T04:30:04+5:30
चपळगाव : धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज आप्पासाहेब कदम-पाटील यांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट देऊन व्यवस्थापनाचे कौतुक ...

धीरज कदम पाटील यांची अन्नछत्रला भेट
चपळगाव : धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज आप्पासाहेब कदम-पाटील यांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट देऊन व्यवस्थापनाचे कौतुक केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी धीरज कदम-पाटील यांचे स्वागत केले. यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, सिद्धाराम कल्याणी, एस.के. स्वामी, लक्ष्मण पाटील, दत्ता माने, राजेंद्र पवार उपस्थित होते.
--
विविध मान्यवरांच्या भेटी
मागील आठवड्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास राज शिष्टाचार विभागाचे अव्वर सचिव राजेंद्र गायकवाड, माजी मंत्री आशिष शेलार यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ सातपुते, महसूल विभागाच्या कक्ष अधिकारी आश्विनी हुंबे, पुणेचे आदित्य जागडे, राज्याचे सहाय्यक आयकर आयुक्त आनंद भास्कर आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.
---
फोटो : २९ धीरज कदम-पाटील
धीरज कदम-पाटील यांचे स्वागत करताना अमोलराजे भोसले.