धक्कादाक! बहिणींनीच केली आई, भाऊ-बहिणीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:48 IST2018-04-09T20:46:22+5:302018-04-09T20:48:34+5:30
सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे येथील तिहेरी खून प्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ जाधव कुटुंबातील आई

धक्कादाक! बहिणींनीच केली आई, भाऊ-बहिणीची हत्या
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे येथील तिहेरी खून प्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ जाधव कुटुंबातील आई, मुलगा व मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती. या खूनानंतर दोघी बहिणी फरार असल्याचे आढळले होते. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्या दोघींनीच आई, बहिण आणि भावाला संपविल्याचे पुढे आले. याप्रकरणी बहिणी धुना रणछोड जाधव(१८) व वसन रणछोड जाधव(१६) यांना अटक करण्यात आली असून त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, तिर्हेजवळ एका झोपडीत हनमबाई रणछोड जाधव (वय ४०), लाखी रणछोड जाधव (२०) मपा रणछोड जाधव (१७) यांचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा गुंता सोडविण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. परंतु, जाधव कुटुंबातील दोघी बहिणी धुना आणि वसन या बेपत्ता होत्या. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चौकशी केली असता त्यांनीच तिहेरी खून केल्याची कबुली दिली.
सोमवारी या दोन्ही मुलींना सोलापुरात आणल्यावर पोलिस अधीक्षक एस.वीरेश प्रभू, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे पोलिस निरीक्षक श्री.विजय कुंभार आदी अधिकारी या मुलींकडे तिहेरी खुनाबाबत तपास करून तिहेरी खुनाचा गुंता सोडवला आहे.