स्वामी समर्थ मठातील महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:24+5:302020-12-05T04:44:24+5:30
अक्कलकोट-सोलापूर मार्गावर अक्कलकोटपासून पाच किलोमीटर अंतरावर श्री स्वामी समर्थ आश्रम मठ आहे. याठिकाणी दौंड, करमाळा, पुणे, फलटण, बार्शी येथील ...

स्वामी समर्थ मठातील महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ
अक्कलकोट-सोलापूर मार्गावर अक्कलकोटपासून पाच किलोमीटर अंतरावर श्री स्वामी समर्थ आश्रम मठ आहे. याठिकाणी दौंड, करमाळा, पुणे, फलटण, बार्शी येथील दत्त दिगंबर पायी दिंडी सोहळ्याचे शेकडो भाविक आले होते. ते आश्रम मठात मुक्कामी होते. मठाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सुरवसे यांनी महाप्रसादाची सोय केली. यानिमित्त भजन, कीर्तन असे कार्यक्रम पार पडले. यावेळी महादेव धर्माधिकारी, पार्वतीबाई धर्माधिकारी, महादेव विजापुरे, अमित कोळी यानी परिश्रम घेतले.
फोटोओळी
श्री स्वामी समर्थ आश्रम मठात आयोजित महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक.
फोटो
०३अक्कलकोट-प्रसाद