देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात; कोरोनाबाबतचा घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:18 IST2020-06-22T18:18:14+5:302020-06-22T18:18:18+5:30
भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची माहिती; उस्मानाबादला ही देणार भेट

देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात; कोरोनाबाबतचा घेणार आढावा
सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव् वाढतोय. प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात येत आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या काही भागातील यंत्रणा कोलमडून पडली आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. बुधवारच्या दौऱ्यात ते सोलापूर आणि उस्मानाबादमध्ये असणार आहेत. सोलापुरात आल्यानंतर ते प्रशासनाच्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत.
याचवेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. याबद्दल लवकरच माहिती दिली जाईल. फिजीकल डिस्टन्सिंगचा विचार करुनच सर्व कार्यक्रमांची रुपरेषा आखली जात आहेत.