शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

देवेंद्र फडणवीसांची माढ्यासाठी नवी खेळी, धवलसिंहांच्या घरी करणार चहापान

By राकेश कदम | Published: April 27, 2024 9:13 PM

माेहिते-पाटलांना इशारा

राकेश कदम. साेलापूर :  माढा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मतदारसंघात राेज नवे राजकीय डाव टाकले जात आहे. फडणवीस यांची रविवारी अकलूजच्या विजय चाैकात जाहीर सभा हाेणार आहे. ही सभा झाल्यानंतर फडणवीस पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांचे विराेधक तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांच्या निवासस्थानी चहापान घेण्यासाठी जात आहेत. 

माढा लाेकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. धैर्यशील यांनी भाजप साेडून पवार गटाची उमेदवारी घेतली. माढा, माळशिरस, फलटण भागातील भाजपचे कार्यकर्त्यांचे पवार गटात प्रवेश हाेउ लागले. अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही भाजपला जाहीर आव्हान दिले. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवी जुळवाजुळव सुरू केली आहे. माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांसाेबत नुकतीच त्यांनी बैठक घेतली. या नेत्यांनी भाजपसाेबत जाण्याचा निर्णय घेतला. आता फडणवीस थेट आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील आणि धैर्यशील माेहिते-पाटील यांचे विराेधक धवलसिंह यांच्या घरी जाणार आहेत.धवलसिंह हाेते गायब

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांच्यावर अकलूज पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. धवलसिंह यांनी या प्रकरणातील आराेप फेटाळले हाेते. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केल्यामुळे ते प्रचारापासून दूर हाेते. मात्र ते रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करणार आहेत.

टॅग्स :madha-pcमाढाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४