शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीला कॅनडाकडून मिळणारे २००० कोटी कुठे गेले?; देवेंद्र फडणवीसांनी केलेली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 15:07 IST

भारत-कॅनडा मैत्री करारातून मिळणार होता निधी 

सोलापूर : विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर विकास आराखड्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती. या घोषणेनुसार कॅनडा सरकारकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यासाठी दोन हजार कोटी रुपये मिळणार होते. यासंदर्भात कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हर्स यांच्या नेतृत्वाखाली कॅनडा सरकारच्या प्रतिनिधींनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पाहणी केली.

जिल्हा प्रशासन व कॅनडा सरकार प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक देखील पार पाडली होती. सध्या या विषयावर राज्य सरकार काहीच बोलेना. या निधीच्या पाठपुरासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे देखील काहीच माहिती नाही. शासन आणि प्रशासनाच्या 'हाताची घडी तोंडावर बोट' या भूमिकेवर वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत-कॅनडा यांच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडा सरकार पंढरपूर विकासासाठी दोन हजार कोटी रुपये देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार पंढरपुरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा, रस्ते तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट)तयार करण्यात आला. या ब्लू प्रिंटचे कॅनडा सरकार प्रतिनिधींनी कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अतुल भोसले हे त्यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष होते. अतुल भोसले यांनी यासंदर्भात कॅनडा सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा देखील केली. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने महत्त्वाची बैठक देखील घेतली. त्यावेळी डॉ. राजेंद्र भोसले हे जिल्हाधिकारी होते. कॅनडा सरकारच्या विकास निधीसाठी आमच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. यापुढेही निधीसाठी प्रयत्न करत राहू. गहिनीनाथ औसेकर महाराज सहअध्यक्ष : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

'संत नगरी' हायटेक सिटी कधी होणार? 

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारी काळात वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकार प्रयत्न करते. परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात. दरवर्षी वारकरी शासनावर नाराजी व्यक्त करुन परततात. याची जाणीव शासनाला आहे. त्यामुळे पंढरपूर ही संतनगरी हायटेक करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. यास मूर्त स्वरूप येईना. जिल्हा प्रशासनाला नाही माहिती

कॅनडा सरकारच्या निधी संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो, असे बोलले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapurसोलापूरCanadaकॅनडा