सोलापुरात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जाळला देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा
By राकेश कदम | Updated: March 21, 2023 14:42 IST2023-03-21T14:42:42+5:302023-03-21T14:42:57+5:30
बार्शी तालुक्यातील घटनेचा निषेध : पिडीत मुलीला ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी

सोलापुरात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जाळला देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा
राकेश कदम : सोलापूर
बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे एका मुलीवर अत्याचार आणि हल्ला झाला. या प्रकरणातील आरोपींना पोलिस यंत्रणा पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत येथील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर हे आंदोलन केले. बळेवाडी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. पिडीत मुलीला तत्काळ ५० लाख रुपयांची मदत जाहीर करावी. या प्रकरणात कारवाईला उशीर केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.