शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

उजनीच्या पाणी नियोजनासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यंत्रणा गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:00 IST

उजनीच्या पाण्याचे नियोजन आवश्यक : शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित

ठळक मुद्देउजनी धरणाच्या पाणी वाटपामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणातआपल्या मतदारसंघात पाणी नेण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून राजकीय दबावाचा वापर

पंढरपूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी पुणे परिसरातील धरणातून उजनीत येणाºया पाण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे धरणाच्या पाण्याचे नियोजन करणारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यंत्रणा गतिमान झाली आहे; मात्र या यंत्रणेने राजकीय दबावाला बळी पडू नये़ त्यांनी या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अन्यथा हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित राहत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसून येते़.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर केवळ भीमा नदी, उजनीचा उजवा कालवा व डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे वितरण करण्यात येत होते़ वारंवार पाण्याच्या वाढत्या मागणीनंतर सध्या उजनी धरणातून डाव्या व उजव्या कालव्याव्यतिरिक्त बेगमपूर, कुरुल, मोहोळ, कारंबा आदी शाखा कालवे, सीना -माढा उपसा सिंचन योजना, भीमा-सीना जोडकालवा, भीमा-सीना जोडकालव्यावरील कव्हे ते शिरापूरपर्यंतचे उपबंधारे, उजनी जलाशयावरील पाणी परवानाधारक उपसा सिंचन योजना, भीमा नदीवरील उजनी ते हिळ्ळी बंधारा, सीना नदीवरील अर्जुनसोंड ते कुडलसंगम बंधारा, माण नदीवरील गुंजेगाव ते सरकोली बंधारा या १२ स्रोताद्वारे उजनी धरणाच्या पाण्याचे वितरण करण्यात येते.

भीमा नदीकाठावरील उजनी तीरावरील ४१ गावे, डाव्या तीरावरील ६६ गावे अशा १०७ गावांमधील बहुतांश ग्रामीण पाणीपुरवठा योजना उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत़ उजनी ते हिळ्ळीपर्यंत भीमा नदीवर २५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यापैकी पंढरपूर व विष्णूपद येथील बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहेत.

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने उजनीच्या पाणी वाटप स्रोतांचे जाहीर प्रकटीकरण करून पाणी शेतकºयांकडून पाणी मागणीचे अर्ज मागविले जातात़ खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम या तीन टप्प्यांमध्ये धरणातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लोकप्रतिनिधी, पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत पालकमंत्री व पाटबंधारे विभागाचे मंत्री बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतात व त्यानुसार पाणी वाटपाचे नियोजन केले जाते.

सुरुवातीच्या काळात बारमाही धोरणानुसार पाणी वाटप करण्याचे नियोजन बदलून ते आठमाही करण्यात आले़ त्यानंतरही पाणी वितरणाचे स्रोत वाढल्याने पाणी वाटपाच्या धोरणामध्ये दरवर्षी बदल होतात़ याचाच परिणाम म्हणून सन २०१० पासून २०१५ पर्यंत उन्हाळी हंगामाच्या जाहीर प्रकटीकरणामध्ये भीमा नदीवरील उजनी ते हिळ्ळी बंधारा या स्रोताचा प्रकटीकरणामध्ये समावेश करण्यात येत होता; मात्र २०१५ ते २०१८ या कालावधीमध्ये प्रकटीकरणातून वगळल्याने नदीकाठच्या शेतकºयांवर अन्याय होऊ लागला़ याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने शेतकºयांकडून पाण्याची मागणी होत नसल्याचा कांगावा केला़  यंदा उजनीची परिस्थिती समाधानकारक असल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे़ 

४१़९३ कोटी पाणीपट्टी थकीत- पाणी मिळविण्यासाठी हट्ट धरणाºया शेतकरी व संस्थांकडून शासनाची पाणीपट्टी भरण्याबाबत मात्र उदासीनता असल्याचे पाणीपट्टीच्या थकीत आकडेवारीवरून जाणवते़ उजनी धरणाच्या सर्व स्रोतावरील लाभधारक शेतकºयांकडे ४१़९३ कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी आहे़ 

पाणी वाटपात राजकीय हस्तक्षेप- उजनी धरणाच्या पाणी वाटपामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे़  आपल्या मतदारसंघात पाणी नेण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून राजकीय दबावाचा वापर होतो़ त्यामुळे पाणी वाटपात ‘बळी तो कान पिळी’ अशी अवस्था होत असल्याचे दिसून येते़ 

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आम्ही स्वत:च्या जमिनी दिल्या़ त्यावेळी लाभक्षेत्रामध्ये बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या जमिनी देण्याचे अभिवचन शासनाकडून दिले होते, मात्र वारंवार होणाºया पाणी वाटपातील बदलामुळे आम्हाला हक्काचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़- अशोक आरकिले,धरणग्रस्त शेतकरी, आजोती 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणPoliticsराजकारणWaterपाणी