शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर केली! पोलीस झाला निलंबित, शांततेस बाधा

By रवींद्र देशमुख | Updated: March 2, 2024 18:37 IST

पोलीस अंमलदार वाडेकर यांनी परवानगीविना बेकायदेशीररित्या पोलीस मुख्यालयाच्या चौकात ‘शिवराम चौक’नावाचा बोर्ड लावला.

सोलापूर: शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज वाढवण्याबद्दल समुदायाला भडकावून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस मुख्यायातील पोलीस अंमलदार काशिनाथ विष्णूपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर यांना कलम १३५ अन्वये पोलीस आयुक्ताच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले. याशिवाय शांततेला बाधा आणण्याचे काम केल्याबद्दल शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते गणेश वानकरसह रवी कोटमुळे यांच्या विरोधातही कलम १८६,१८८, १२० ब सह कारवाई करण्यात आली.

या आदेशात म्हटले आहे की, पोलीस अंमलदार वाडेकर यांनी परवानगीविना बेकायदेशीररित्या पोलीस मुख्यालयाच्या चौकात ‘शिवराम चौक’नावाचा बोर्ड लावला. तसेच १९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तालयात मंडळाचे अध्यक्ष, साऊड चालक-मालक यांची बैठक आयोजित करुन साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादेत ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक बेस लावून नयेत अशी सूचना केली होती. मिरवणुकीत मंडळास तसेच गणेश वानकर व इतरांना भडकावून आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे. नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही अशी चिथावणीखोर भाषा वापरल्याचे आदेशात म्हटले आहे. लेझीम खेळून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा२ जून २०२३ रोजी हिंदू साम्राज्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आपण बंदोस्तास नसतानाही सहभागी झालात. लेझीम खेळून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा येईल, असे कृत्य केल्याचे या आदेशामध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस