वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:26+5:302020-12-28T04:12:26+5:30
यावेळी शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, जिल्हा संघटक शोएब सय्यद, युवक अध्यक्ष सुहास भालेराव, दशरथ जाधव, किशोर ढोले, महेश खुणे, स्वप्नील ...

वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार
यावेळी शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, जिल्हा संघटक शोएब सय्यद, युवक अध्यक्ष सुहास भालेराव, दशरथ जाधव, किशोर ढोले, महेश खुणे, स्वप्नील भालशंकर उपस्थित होते.
विवेक गजशिव म्हणाले, आघाडीचे संस्थापक डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपर्यंत राजकीय व्यवस्थेने नाकारलेल्या सर्व वंचित समाजघटकांना बरोबर घेऊन या निवडणुका लढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील धानोरे, पाथरी, घाणेगाव, तावडी, गोरमाळे, खांडवी, बाभूळगाव, कोरेगाव, काटेगाव, चारे, पिंपळगाव, श्रीपत पिंपरी, कासरवाडी, कव्हे, गुळपोळी, गाताचीवाडी, वालवड, वानेवाडी, खडकोणी, भोयरे , कारी चिखर्डे, बावी, उपळाई( ठों) या गावांची दौरे पूर्ण झाले आहेत. यातील काही गावांमध्ये स्वतंत्र पॅनल उभे करण्यासाठीचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.