टेंभुर्णीच्या पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST2021-06-10T04:16:17+5:302021-06-10T04:16:17+5:30

माढा : दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांवर दहा दिवसात निलंबन करून ॲट्रॉसिटीअंतर्गत ...

Demand for suspension of Tembhurni police inspector | टेंभुर्णीच्या पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी

टेंभुर्णीच्या पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी

माढा : दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांवर दहा दिवसात निलंबन करून ॲट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करावी, या मागणीचे निवदेन देण्यात आले.

टेंभुर्णी शहराचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मातंग समाजावर केलेल्या अमानवी कृत्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. राजकुमार केंद्रे यांनी पदाचा गैरवापर करून मातंग समाजातील महिला व पुरुषांना दमदाटी केली, असा आरोप आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई न केल्यास दलित स्वयंसेवक संघ, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष फकिरा जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण, अनिल जगताप, कुंदन पवार, माढा तालुका अध्यक्ष किरण पवार, प्रवीण पवार उपस्थित होते.

----

Web Title: Demand for suspension of Tembhurni police inspector