कुरुल, कामती उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्याची प्रहारची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:32+5:302021-08-26T04:24:32+5:30
कुरुल : महावितरणने कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी थेट उपकेंद्रातूनच वीजपुरवठा बंद केला आहे. फक्त एक तास वीजपुरवठा होतो. सध्या शेतकरी ...

कुरुल, कामती उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्याची प्रहारची मागणी
कुरुल : महावितरणने कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी थेट उपकेंद्रातूनच वीजपुरवठा बंद केला आहे. फक्त एक तास वीजपुरवठा होतो. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. बंद केलेला वीजपुरवठा सुरळीत करा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने कुरुल व कामती सबस्टेशनचे शाखा अभियंता रमजान अत्तार यांच्याकडे केली.
या मागणीबाबत अत्तार यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत चालू न केल्यास महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. साखर कारखान्याने आठ महिने झाले तरी उसाचे बिल दिले नाही. मग शेतकरी राजाकडे कुठून पैसे येणार. त्यामुळे शेतीपंपाची वीज त्वरित सुरळीत करावी अन्यथा कुरुल व कामती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मोहोळ तालुका प्रहार संघटनेच्या वतीने अध्यक्ष वैभव जावळे व प्रहार मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे यांनी दिला आहे.
---