मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:26+5:302021-06-20T04:16:26+5:30

सोलापूर : मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समवेत बैठक बोलावून ते सोडवावेत, अशी मागणी ...

Demand for resolution of pending issues of Matang community | मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

सोलापूर : मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समवेत बैठक बोलावून ते सोडवावेत, अशी मागणी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील प्रदेश काँग्रेस कमिटी गांधी भवन येथे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत राज्यातील मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याकरिता राज्य शासनाने विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ठराव मंजूर करून केंद्र सरकारला शिफारस करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी कार्याध्यक्ष विश्वनाथ चव्हाण, विभाग संघटक निशांत भोंडवे, कुलाबा तालुका अध्यक्ष संजय नेटके, मुंबई प्रदेश सचिव राहुल ससाने, डॉ आंबेडकरनगर वॉर्ड अध्यक्ष सोनू साठे, मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष रेणुका ताई शेंडगे, प्रशांत बाळू ससाने उपस्थित होते.

----

फोटो : १९ सुरेश पाटोळे

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर निवेदन देताना सुरेश पाटोळे, विश्वनाथ चव्हाण, निशांत भोंडवे, संजय नेटके, राहुल ससाने.

Web Title: Demand for resolution of pending issues of Matang community