पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रकियेत विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST2021-02-13T04:22:28+5:302021-02-13T04:22:28+5:30
सोलापूर : महाराष्ट्रातील काही मागास जातींना विशेष सवलती देवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाने विशेष मागास प्रवर्गाची ...

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रकियेत विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी
सोलापूर : महाराष्ट्रातील काही मागास जातींना विशेष सवलती देवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाने विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती केली. या विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यासंदर्भात शासन समाजकल्याण व विशेष सहाय्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. विशेष मागासवर्गीयांबाबत तरतुदी विद्यापीठातील सर्व विद्याशाखातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागू करणे आवश्यक आहे. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
याबाबत त्यांनी सामंत यांना निवेदन दिले. विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे पूर्वी इतर मागास वर्गीयामध्ये समाविष्ट होते. त्यांना इतर मागास वर्गाचे आरक्षणाचा लाभ दिला जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी. ही प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्याबाबत माहिती प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपुस्तिकेत दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया त्याप्रमाणे राबविली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी राकेश पुंजाल, शेखर कटकम आणि पद्मशाली युवक संघटनेचे निमंत्रक उपस्थित होते.
----
फोटो : १२ अशोक इंदापुरे
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेवर उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना अशोक इंदापुरे.