साकीनाका येथील हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:51+5:302021-09-14T04:26:51+5:30

करमाळा : साकीनाका मुंबई येथील ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्यात आले. ही पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना ...

Demand for execution of accused in Sakinaka murder case | साकीनाका येथील हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी

साकीनाका येथील हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी

करमाळा : साकीनाका मुंबई येथील ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्यात आले. ही पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना असून आरोपींवर तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तत्काळ फाशी द्यावी अशी मागणी करमाळा येथे रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ज्येष्ठ दलित नेते लक्ष्मण भोसले यांनी निवेदन वाचून दाखवले. यावेळी दत्ता बनसोडे, भीमराव कांबळे, नंदकुमार कांबळे,सुहास ओहोळ,उत्तम कांबळे ,प्रसेनजित कांबळे,मयूर कांबळे, प्रफुल्ल दामोदरे, नामदेव वाघमारे ,भीमराव कांबळे सर कृष्णा जाधव, रणजित शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी माजी सभापती शेखर गाडे, शिवसेना नेते महेश चिवटे,बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी पाठिंबा दर्शवला.

------

फोटो : १३ करमाळा

Web Title: Demand for execution of accused in Sakinaka murder case