शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रात मोठी मागणी, कंदर, अकलूज येथुन निर्यात, परदेशात मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:49 IST

ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे. 

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवडएकूण उत्पादनाच्या २० टक्के केळीची ओमान, जेद्दाह, सौदी अरब, अफगाणिस्तान आदी देशात निर्यात केळीच्या पिकाला बाजारात मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. 

संताजी शिंदेसोलापूर दि २५ : ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते. एकरी ३० टन केळीचे उत्पादन होत असते. एकूण उत्पादनाच्या २० टक्के केळीची ओमान, जेद्दाह, सौदी अरब, अफगाणिस्तान आदी देशात निर्यात केली जाते. सध्या १५ दिवसांतून १ ते २ कंटेनर निर्यात केली जाते. जिल्ह्यात केळीचे उत्पादन वाढत असून सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे. अरब राष्ट्रात जाणारी केळी कच्ची असतानाच झाडावरून काढली जाते. या केळीला कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी केली जात नाही. योग्य तापमानात ही केळी मुंबई व तेथून जहाजातून अरब राष्ट्रात पाठविण्यात येते. १२ ते १५ दिवसात हा माल अरब राष्ट्रात पोहचतो. माल पोचेपर्यंत योग्य तापमानात नैसर्गिक पद्धतीने पिकून तयार होतो. सध्या सोलापूरच्या केळीला परदेशातून मागणी वाढत आहे. सौदी अरबसह अन्य राष्ट्रांमध्ये क्वॉलिटीची (गुणवत्तेची) केळी म्हणून याची ओळख आहे. किलोला निर्यातदाराकडून ३० रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील अनेक शेतकºयांनी सध्या केळीच्या उत्पादनावर जास्त भर दिला आहे. ४० रुपये प्रतिकिलो भावाने विकल्या जाणाºया ज्वारीकडे पाठ फिरवून ३० रुपये किलो भावाने विकल्या जाणाºया केळीच्या पिकाला करमाळा तालुक्यातील शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे. -----------------------सोलापूरची दर्जेदार केळी अशी परदेशात ओळख आहे. येथील केळीला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. रशिया आणि ग्रीस या देशातही सोलापूर जिल्ह्यातून केळी जातात; मात्र हे प्रमाण कमी आहे. वाहतुकीचा कालावधी आणि त्याचा टिकाऊपणा लक्षात घेता रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करता येत नाही. जलद वाहतुकीच्या दृष्टीने भविष्यात विमानाद्वारे निर्यात करण्यासंदर्भात विचार केला जात आहे. - किरण डोके, निर्यातदार, कंदर. ---------------------------जिल्ह्यात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. केळीला बाजारात मोठी मागणी असून उत्पादनाच्या एकूण २0 टक्के माल परदेशात निर्यात केला जातोे. निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. केळीच्या पिकाला बाजारात मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी. 

टॅग्स :Solapurसोलापूरfruitsफळे