दारूबंदीच्या मागणीने ग्रामसभेत धरला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:31+5:302021-09-14T04:26:31+5:30
सलगर : पिण्याचा पाण्याचा प्रश्न, हागणदारीमुक्ती, प्राथमिक आरोग्य आणि दारुबंदीच्या विषयावर सलगरची ग्रामसभा वादळी ठरली. या सभेत प्रामुख्याने दारूबंदीवर ...

दारूबंदीच्या मागणीने ग्रामसभेत धरला जोर
सलगर : पिण्याचा पाण्याचा प्रश्न, हागणदारीमुक्ती, प्राथमिक आरोग्य आणि दारुबंदीच्या विषयावर सलगरची ग्रामसभा वादळी ठरली. या सभेत प्रामुख्याने दारूबंदीवर सर्वसामान्यांनी जोर दिला. अक्कलकोट तालुक्यात सलगर ग्रामपंचायतीत ग्रामसभा भरवण्यात आली. सरपंच सुरेखा गुंडरगी या अध्यक्ष म्हणून उपस्थिती होते. गावाचे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा अशोक शिवबसप्पा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदीप तोरसक, तलाठी दत्ता पांढरे, पोलीस पाटील श्रीशैल बिराजदार, आरोग्य सेविका सुप्रिया बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामस्थांनी गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मांडला. महिला शौचालय विषय, अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण, प्राथमिक आरोग्य केंद्र विषय, जनावरांचे दवाखाना, जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीचे प्रश्न मांडले गेले. मुख्यत्वेकरून अवैधरित्या हातभट्टी दारू व देशी दारूचे दुकाने वाढत असल्याचा प्रश्न मांडला गेला. गावात दारू विक्री बंद करावी, या मागणीने चंद्रकांत सांगोलगी यांनी जोर लावून धरला.
यावेळी मलम्मा समाणे, मल्लिनाथ भासागी, जावेद बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी आणि आशा वर्कर उपस्थित होते.
-----------
फोटो : १३ सलगर
सलगरच्या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अशोक पाटील यांचा सत्कार करताना सरपंच सुरेखा गुंडरगी आणि ग्रामस्थ