गलांडे खून प्रकरणात आरोपींना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:19+5:302020-12-09T04:17:19+5:30
बार्शी : मासेमारीच्या जागेवरून करमाळा तालुक्यात चिखलठाण येथे भांडणात अजित नवनाथ गलांडे याचा खून झाला. बार्शीच्या जिल्हा सत्र ...

गलांडे खून प्रकरणात आरोपींना जामीन
बार्शी : मासेमारीच्या जागेवरून करमाळा तालुक्यात चिखलठाण येथे भांडणात अजित नवनाथ गलांडे याचा खून झाला. बार्शीच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. आर. एस. पाटील यांनी या खून प्रकरणातील आरोपी राजाराम गलांडे व संतोष गलांडे या दोघांची ३० हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
११ जुलै रोजी गलांडे मळ्याजवळ मासेमारी करत असताना ही घटना घडली होती. यात अजित गलांडे याचा खून झाला तर मिथुन गलांडे हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर मयताचे वडील नवनाथ गलांडे यांनी उमेश राजाराम गलांडे, राजाराम गलांडे, संतोष गलांडे व इतर दोन यांच्याविरुद्ध करमाळ पोलिसात फिर्याद दाखल झाली होती. पोलिसांनी या तिघांना अटकही केली होती.
या प्रकरणात आरोपी राजाराम गलांडे व संतोष गलांडे यांना जमीन मिळण्यासाठी ॲड. निखिल पाटील यांनी काम पाहिले.