शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

हार, फुलांऐवजी बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी घेऊन या ‘वही-पेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:21 PM

गती शिक्षणाला : सत्यशोधक परिवाराचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते भेट

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतातअभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते

सोलापूरशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र दिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी अभिवादनाला येणाºया भीमसैनिकांकडून एक वही व पेन देण्याचे आवाहन सत्यशोधक परिवाराच्या वतीने केले जाते. अभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते. 

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते. लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतात. पुष्पहार, फुले, मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून अभिवादन करतात. 

अभिवादनानंतर दुसºया दिवशी या सर्व साहित्याचे रूपांतर निर्माल्या (कचरा) मध्ये होते. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भावना होती. आजही समाजात असे कुटुंब आहेत की जे केवळ शाळेला जाण्यासाठी वही व पेन नसल्याने काही वर्षातच शाळा सोडून देतात. 

शाळा शिकवण्याची इच्छा खूप असते, मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च पालकांना उचलता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना किमान वही व पेन देऊन शिक्षणासाठी मदत करावी या उद्देशाने सत्यशोधक परिवाराच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे. १४ एप्रिल २0१४ रोजी पहिल्यांदा हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरू केला. प्रतिवर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. लोक वही व पेन आणून देतात, त्याचे संकलन केले जाते. जून महिन्यात जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा महापालिकेच्या शाळा व अन्य खासगी शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप केले जाते. शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले जाते तेव्हा ते मनापासून खूप आनंदी होतात. 

आजतागायत ४0 शाळांमधून २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. बहुतांश शाळा संस्थेच्या या उपक्रमाची वाट बघतात. 

फोन करून विचारणा करतात, गरजू विद्यार्थ्यांची संख्या सांगतात. यंदाही हा उपक्रम राबवला जाणार आहे़ एक वही आणि पेन घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षणाला आधार हीच खरी आंबेडकर जयंती : विक्रम गायकवाड - बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, ते मोठ्या पदांवर जावेत, स्वत:बरोबरच कुटुंबाचा आणि समाजाचा उद्धार करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला आहे. आजही बहुतांश कुटुंबातील पालक हे सकाळी उठून कामाला गेल्याशिवाय रात्री एकवेळचे पोटभर जेवण करू शकत नाहीत अशी अवस्था आहे. केवळ पैसा नसल्याने शिक्षणाची इच्छा असतानाही अनेक विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात. त्यांना कुठेतरी छोटीशी मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १४ एप्रिल रोजी अभिवादनासाठी केवळ एक वही आणि पेन घेऊन येण्याचे आवाहन केले जाते. या उपक्रमाला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे आणि हिच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे असे मला वाटते, अशी माहिती सत्यशोधक परिवाराचे विक्रम गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती