मंद्रुप ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:22 IST2021-05-11T04:22:54+5:302021-05-11T04:22:54+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य ...

Dedication of ambulance for Mandrup Rural Hospital | मंद्रुप ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मंद्रुप ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी या हेतूने मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार सुभाष देशमुख यांनी स्थानिक विकास निधीमधून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले.

यावेळी आ. देशमुख यांच्यासह अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, पं. स. सभापती सोनाली कडते, सरपंच कलावती खंदारे, गुरण्णा तेली, हणमंत कुलकर्णी, प्रशांत कडते, गौरीशंकर मेंडगुदले, मळसिद्ध मुगळे, डॉ. वाघमारे, विश्वनाथ हिरेमठ आदी उपस्थित होते.

१०मंद्रुप०१

मंद्रुप येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, तहसीलदार उज्ज्वला सोरटे, सभापती सोनाली कडते, सरपंच कलावती खंदारे आदी.

Web Title: Dedication of ambulance for Mandrup Rural Hospital