विद्यार्थ्यांची डीएड्कडे पाठ डीएड्धारक त्रस्त

By Admin | Updated: November 22, 2014 00:14 IST2014-11-21T22:50:28+5:302014-11-22T00:14:48+5:30

२०१०पासून भरती प्रक्रियाच बंद

Dedicated text of the student Dedicated to the Deed | विद्यार्थ्यांची डीएड्कडे पाठ डीएड्धारक त्रस्त

विद्यार्थ्यांची डीएड्कडे पाठ डीएड्धारक त्रस्त

रत्नागिरी : राज्य शासनाने शिक्षक भरतीवर आणलेल्या बंदीमुळे डी. एड. महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. नोकरीसाठी सीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वी सीईटी घेण्यात आली मात्र, २०१० पासून भरती प्रक्रियाच थांबविल्यामुळे डी. एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. डीएड करून नोकरी मिळणे अवघड असल्यामुळे विद्यार्थी डीएड करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डी. एड. महाविद्यालयात एकूण ८९० जागांपैकी ७१८ जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी डी. एड. तर माध्यमिक शिक्षकांसाठी बी. एड. अभ्यासक्रम सक्तिचा आहे. सुरूवातीला दहावीच्या गुणांवर डी. एड.साठी प्रवेश मिळत होता. परंतु त्यानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारावा, या हेतूने शासनाने बारावीनंतर डी. एड. अभ्यासक्रम सुरू केला. डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी उपलब्ध होत होती. परंतु नोकरीसाठी शासनाने सीईटी परीक्षा डी. एड. उत्तीर्णधारकांना सक्तीची केली. २००८ साली सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २००७ पासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थी डी. एड. उत्तीर्ण झाले. परंतु नोकरीअभावी बेकारांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. गतवर्षीपासून शासनाने टीईटी परीक्षा डी. एड.धारकांना सक्तीची केली. गतवर्षी जिल्ह्यातून या परीक्षेला ८००० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र, परीक्षेचा निकाल फक्त चार टक्के इतकाच लागला. बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. हजारो रूपये खर्च करून डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी डी. एड.कडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयांतून ८९० जागा असताना यावर्षी केवळ १७२ विद्यार्थ्यांनीच डी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यामुळे तब्बल ७१२ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. सन २००९-१०मध्ये ९८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१०-११मध्ये १०१९, २०११-१२मध्ये ७२७, २०१३-१४मध्ये ९८, २०१४-१५मध्ये १७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७४ विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हाभरातून ३९०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रवेश अर्ज सादर केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत टीईटीसाठीही विद्यार्थीसंख्या घटलेली दिसून येत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ८९० पैकी ७१८ जागा रिक्त सालविद्यार्थी संख्या २००९-१०९८८ २०१०-१११०१९ २०११-१२७२७ २०१३-१४९८ २०१४-१५१७२

Web Title: Dedicated text of the student Dedicated to the Deed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.