१६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST2021-05-13T04:22:13+5:302021-05-13T04:22:13+5:30
या बैठकीमध्ये सात कंत्राटी, आठ नर्सेस व एक वॉचमन यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला. तसेच कायम ...

१६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय
या बैठकीमध्ये सात कंत्राटी, आठ नर्सेस व एक वॉचमन यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला. तसेच कायम कामगारांचे वेतन सर्व प्रकारचे आर्थिक लाभ व सेवा सुविधा देण्याचा निर्णयदेखील एकमताने घेण्यात आला. कामगारांचा ताण लक्षात घेता हॉस्पिटल वाहनचालकांना जादा कामासाठी नियमाप्रमाणे भत्ता देण्याचा निर्णयही घेण्यात आला. सध्या कोविड-१९ची परिस्थिती लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये सर्व कामगारांना विशेष प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे ही संस्थेने मान्य केले.
या बैठकीत संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष बी.टी. पाटील, सचिव बापू शितोळे, आरोग्य समितीचे दिलीप रेवडकर, हॉस्पिटल सुपरीडेंटंट डॉ. रामचंद्र जगताप, प्रशासनाधिकारी महादेव ढगे व संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष प्रा. तानाजी ठोंबरे, कार्याध्यक्ष लहू आगलावे, सचिव प्रवीण मस्तुद, सहसचिव भारत भोसले आदी उपस्थित होते.