शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२० टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव, पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:23 IST

उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्दे२० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतलीपाणी वापर संस्थांसाठी सव्वा टीएमसी पाणी फेब्रुवारीनंतर आरक्षित ठेवले जाईल फेब्रुवारी व मार्चमध्ये भीमा नदीतून पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६  : उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. उजनीच्या पाणी नियोजनाबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता रा. ज. कांबळे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. व्ही. जोशी, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यू. बी. माशाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. खडतरे, एन. एम. गयाळे, बी. के. नागणे आदी उपस्थित होते.सीना नदीवरून मोहोळ नगरपालिकांसह इतर पाणी वापर संस्थांसाठी सव्वा टीएमसी पाणी फेब्रुवारीनंतर आरक्षित ठेवले जाईल, असे चौगुले यांनी सांगितले. बोरी नदीतून ०.३० टीएमसी पाणी दुधनी, मैंदर्गी आणि अक्कलकोट नगरपालिकांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय झाला. हिळ्ळी बंधाºयासाठी फेब्रुवारी व मार्चमध्ये भीमा नदीतून पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल. सोलापूर जिल्हा परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी अद्याप मागणी केलेली नाही. मागणी नोंदवल्यास ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असणारे पाणी आरक्षण केले जाईल, असे चौगुले यांनी सांगितले. यावर ग्रामपंचायतीसाठी आवश्यक पाण्याची मागणी दोन दिवसात जलसंपदा विभागाकडे नोंदवावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या. पिण्यासाठी नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. यासाठी तहसीलदार, जलसंपदा, महावितरण या विभागाच्या अधिकाºयांची समिती नियुक्त करावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्या.------------------------------थकीत पाणीपट्टी वसुली करून द्यावीया बैठकीत चौगुले यांनी थकीत पाणीपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेकडे सर्वाधिक ५२ कोटी थकीत आहेत. साखर कारखाने आणि नगरपालिकांकडेही थकबाकी असल्याचे जलसंपदाच्या अधिकाºयांनी सांगितले. नगरपालिकांकडील थकीत रक्कम जिल्हाधिकाºयांनी वसूल करून द्यावी, अशी मागणी चौगुले यांनी केली. जिल्हाधिकाºयांनी नगरपालिकांच्या अनुदानातून ही रक्कम द्यायला सांगू, असे सांगितले. तर थकीत कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरण