मृत्यू निमोनियाने मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:54 PM2020-07-06T18:54:45+5:302020-07-06T18:57:17+5:30

पंढरपूर नगरपरिषद सतर्क; संपर्कातील  २२ नागरिकांना केले क्वारंटाइन

Death pneumonia, however, was cremated by the city council as a precautionary measure | मृत्यू निमोनियाने मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने केले अंत्यसंस्कार

मृत्यू निमोनियाने मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने केले अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलेनगरपरिषद प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य रोगाबाबत खबरदारीचा उपाय खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले

पंढरपूर : पंढरपुरातील गांधी रोड येथील एका वयोवृद्ध व्यक्तीचा रविवारी रात्री नीमोनिया या आजाराने मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहे.

गांधी रोड वरील रविवारी त्रास होत होता. यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना निमोनिया असल्याचे सांगण्यात आले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारा साठी नेण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी अनिकेत अनिकेत मनोरकर यांनी रुग्णवाहिकेतून संबंधित व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेला.

यामुळे नगरपरिषद प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य रोगाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील तीन व्यक्ती सह मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले. 
---------------
संपर्कातील  २२ नागरिकांना क्वारंटाइन
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. लवकरच त्यांची कोरोना बाबत चाचणी करून घेण्यात येईल असे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले.
 

Web Title: Death pneumonia, however, was cremated by the city council as a precautionary measure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.