रेल्वेखाली सापडून सांगोल्यात प्रवाशाचा मृत्यू

By Appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 18:57 IST2017-08-01T18:57:15+5:302017-08-01T18:57:21+5:30

सांगोला दि १ : पाणी पिण्यास स्टेशनवर उतरलेला प्रवासी रेल्वे डब्यात चढत असताना हात निसटल्याने रेल्वेखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Death of a passenger by traveling under train from Sangli | रेल्वेखाली सापडून सांगोल्यात प्रवाशाचा मृत्यू

रेल्वेखाली सापडून सांगोल्यात प्रवाशाचा मृत्यू


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि १ : पाणी पिण्यास स्टेशनवर उतरलेला प्रवासी रेल्वे डब्यात चढत असताना हात निसटल्याने रेल्वेखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवार दि. ३१ जुलै रोजी सांगोला रेल्वे स्टेशनवर मिरज-सोलापूर पॅसेंजर गाडीखाली झाला. पोपट विठ्ठल सुळे (वय ३०, रा. खर्डी, ता. पंढरपूर) असे ठार झालेल्या रेल्वे प्रवाशाचे नाव आहे. 
खर्डी येथील पोपट सुळे सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास कामानिमित्त मिरजला गेले होते. काम आटोपून ते मिरज-सोलापूर रेल्वेने पंढरपूरकडे निघाले होते. रेल्वे सांगोला स्टेशनवर थांबली असता पोपट सुळे पाणी पिण्यासाठी खाली उतरले. यावेळी रेल्वे सुरु झाल्यानंतर बोगीत चढत असताना हात निसटल्याने रेल्वेखाली सापडून हा अपघात घडला. रेल्वे प्रवासी पोपट सुळे याच्या अंगावरुन रेल्वे गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आॅनड्यूटी सांगोला स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसात खबर दिली आहे. तपास हवालदार संजय चिटणीस करीत आहेत.

Web Title: Death of a passenger by traveling under train from Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.